
महामार्गावरील खड्ड्यांमुळे व,धुळीमुळे वाहनचालक हैराण
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सपाटीकरणाचे काम खेड परिसरात वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात या महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते आता ठेकेदार कंपनीकडून सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य होत होते आता पाऊस गेल्यावर ऊन पडल्यानंतर या ठिकाणी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या ठिकाणाहून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे .
www.konkantoday.com




