महामार्गावरील खड्ड्यांप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ,चिपळूण राष्ट्रवादीची मागणी
चिपळूण परिसरात महामार्गावरील खड्ड्यांमुळे चार जणांचा नाहक बळी गेला आहे.या सर्व प्रकाराला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणेत येणार आहे.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते,माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी याबाबत आक्रमक पवित्रा उचलला आहे.जर पोलीस स्थानकात तक्रार घेतली गेली नाही तर थेट न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.
www.konkantoday.com