
रत्नागिरी येथे घरफोडी एक लाखाचा ऐवज लांबविला
रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील राहणारे मिलिंद देसाई यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून तेथून एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.यातील फिर्यादी मिलिंद जयराम देसाई हे आपल्या कुटुंबासह गणपती सणासाठी आपल्या मुळगावी म्हणजे खावडी लांजा गेले होते.त्यामुळे त्यांचा रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील असलेला बंगला बंद होता.या बंगल्याच्या खिडकीचे गज चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने , चांदीची भांडी व रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.रत्नागिरी पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com