मुदत संपल्याने भाजपच्या कार्यकारिणीसह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी बदलणार

रत्नागिरी-आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व सर्व तालुका कार्यकारिणीत बदल केले जाणार आहेत. या कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची तीन वर्षांची मुदतसुद्धा संपली आहे. महिला आघाडी,अल्पसंख्यांक, सहकार, अनुसूचित जाती जमाती आघाडी, मच्छीमार आघाडी, भारतीय जनता युवा मोर्चा आदी आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांचीही मुदत संपल्याने लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.
भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची तीन वर्षांची गतवर्षी संपली आहे. मात्र लगचेच लोकसभा निवडणुका असल्याने या कार्यकारिणीला पुढे काही काळासाठी मुदतवाढ देण्यात आली. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती वरिष्ठांनी केली. त्यांनी सुरवातीपासून आक्रमक धोरण अवलंबले असून जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्यास प्रारंभ केला आहे. राजापूरमधील काँग्रेसच्या एकमेव जि. प. सदस्यानेही अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक गावचे सरपंचसुद्धा भाजपमध्ये येऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद नक्कीच पाहायला मिळणार असल्याचे यावरून दिसू लागले आहे.यासंदर्भात भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा, तालुका व सर्व आघाड्यांच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नव्याने निवड केली जाणार आहे. भाजपची प्रत्येक आघाडी सक्षम करण्यावर भर राहील. जिल्ह्याच्या प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व दिले जाईल. भाजप कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकारिणीत बदल केले जाणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button