मंडणगड एसटी स्थानकातही प्रवाशांचा गोंधळ ,तीन तास गाडी उशिरा सोडली
गणपती उत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांना आता मुंबईकडे परतण्याचे वेध लागले असून रेल्वे, एसटी बसेस स्थानके फुल झाली आहेत.मंडणगड वरून मुंबईकडे जाणारी बस वेळ होऊनही तीन तास न सुटल्याने प्रवासी संतप्त झाले. मुंबईकडे जाणारी गाडी सकाळी साडे अकरा वाजता सुटणार होती परंतु प्रत्यक्षात तीन वाजले तरी गाडी सुटली नाही त्यामुळे प्रवाशांनी मंडणगड बस आगार स्थानकाच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना संतप्त आवाजात जाब विचारला जर गाडी सुटली नाही तर इतर गाड्या सोडू देणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी तीन तासाने ही गाडी सोडण्यात आली. एसटीच्या कारभाराबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com