
चिपळूण स्थानकातही मांडवी एक्स्प्रेसचे दरवाजे आतून बंद केल्याने गाडीत चढणाऱ्या प्रवाशांच्या मध्ये गोंधळ
कोकणातील गणपती उत्सवाची सांगता झाल्याने चाकरमान्यांचा मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी केली असून कोकण रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या प्रवाशांच्या गर्दीने फुल झाल्या आहेत. आधीच्या स्टेशनवरील प्रवासी आरक्षित डब्यात देखील चढत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून प्रवाशांना डब्यात जागाच मिळत नसल्याने डब्यात चढायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.मडगावहून मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस चिपळूण स्थानकात आली असता स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी प्रयत्न केला परंतु डब्यातील प्रवाशांनी गाडीचे दारे बंद करून ठेवल्याने गोंधळ उडाला.आपण आरक्षित केलेल्या डब्यात प्रवेश मिळत नसल्याने स्थानकावरील प्रवासी संतप्त झाले.दरम्यान रेल्वे पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.परंतु अनेक डब्यातील प्रवाशांनी आतून दारे उघडली नाहीत.अनेकांना आपल्या आरक्षित केलेल्या डब्यात प्रवेश मिळाला नाही परंतु मिळेल तेथून त्यानी रेल्वे डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.यामुळे चिपळूण स्थानकातही गोंधळ उडाला होता.या गोंधळातच ही मांडवी गाडी पुढे रवाना झाली आणि ती खेडमध्ये न थांबता निघून गेली.