
चिपळुणात महामार्गावरील खड्डय़ांमुळे तरुणीचा बळी
मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. चिपळूण जवळ महामार्गा वरील खड्ड्यामुळे प्रियांका शिंदे या तरुणीचा नाहक बळी गेला आहे.बहादूर शेख नाका गांधीनगर परिसरात राहणारी तरुणी मोटारसायकलवर मागे बसून जात असता.चिपळूण शहराजवळील पॉवर हाऊस येथील महामार्गावरील खड्ड्यांमध्ये त्यांची मोटारसायकल आदळली यामुळे मागे बसलेली प्रियांका मोटारसायकल वरून उडून खाली रस्त्यावर कोसळली.या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तिला कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले.परंतू तेथे उपचाराच्या दरम्यान तिचे दुःखद निधन झाले.दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील खड्ड्यांमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
www.konkantoday.com