
ग्रामीण मराठी साहित्यसंमेलन २०२० साली नाटे गावात साजरे होणार
राजापूर: सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी २०२० मध्ये राजापूर तालुक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या यशवंतगडाच्या पायथ्याशी नाटे येथे आयोजित केले आहे. राजापूर आणि लांजा तालुक्यात १९५१ पासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई यांच्यावतीने संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.राजापूर आणि लांजा तालुक्यातील ऐतिहासिक गावे प्रकाशात यावीत, या गावांचा देखील विकास व्हावा, पर्यटनाचा दर्जा मिळावा आणि त्या त्या भागातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी २०१५ पासून संघाने ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही सुरू केली. २०२० मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नाटे येेथे होणार आहे. नाटे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
www.konkantoday.com