
राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा संप मागे
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. संघटनेचे रत्नागिरीतील नेते हेमंत साळवी संघटनेने संप मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल विभागाकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत ठोस आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com