
परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेची जादा गाडी
गणेश उत्सवानिमित्त मुंबई सीएसटीएम व रत्नागिरी स्टेशनदरम्यान सेंट्रल रेल्वेच्या मदतीने जादा गाडी सोडण्यात येणार आहे.गणेश उत्सवानिमित्त कोकणात दाखल झालेल्या चाकरमानांनच्या परतीच्या प्रवासासाठी गाडी उपयुक्त ठरणार आहे.ट्रेन नंबर ०१२३१ मुंबई सीएसटीएम रत्नागिरी ही गाडी मुंबई सीएसटीवरून दि ८ सप्टेंबर २०१९ मध्य रात्री १२.३० ला सुटेल व रत्नागिरीला त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहचेल.
गाडी नंबर ०१२३२ रत्नागिरी मुंबई सीएसटीएम ही गाडी रत्नागिरी येथून दि.८ सप्टेंबर २०१९ला संध्याकाळी सात वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी पाच वाजता मुंबई सीएसटीएम येथे पोहोचेल.ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.
www.konkantoday.com