चिपळूणची साक्षी गांधी झळकणार मोठ्या पडद्यावर

चिपळूण: चिपळूणची साक्षी महेश गांधी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रॉडक्शन निर्मित संजय नेमाणे दिग्दर्शित मन उधाण वारा सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून तिने ही भरारी घेतली आहे.
मन उधाण वारा हा सिनेमा येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यामध्ये साक्षीने वना (वनश्री) नावाची भूमिका साकारली आहे. तिने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून उत्तम अभिनयाच्या सादरीकरणाने नावलौकीक मिळवला आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही साक्षीने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. ब्युटी सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होत अनेक बक्षिसे तिने मिळवली आहेत.
कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वप्न उराशी बाळगून ही चिपळूणची सुकन्या गेली तीन वर्षे मुंबईत परिश्रम घेत आहे. या सिनेमाबरोबर तिचा अजून एक सिनेमासुद्धा लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच येत्या ९ सप्टेंबर पासून सुरु होणार्‍या भाडखाऊ नावाच्या वेबसिरीजमध्येसुद्धा साक्षी दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button