
कोळथरे गाव प्लॅस्टिकपासून मुक्त प्लॅस्टिक कचरा गॅसीफायरद्वारे होणार नष्ट
दापोली: कोळथरे गाव प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी सरपंच ज्योती महाजन यांनी एक वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. व्हर्जिन विंडस् या हॉटेलमधील गॅसीफायर उपकरणाद्वारे संपूर्ण प्लास्टिक कचरा नष्ट केला जाणार आहे.
हा कचरा साठविण्यासाठी डंपिंग ग्राऊंड तयार करण्याचा आग्रह आहे. कोळथरे सरपंच महाजन यांचा डंपिंग ग्राऊंडला विरोध होता. प्लास्टीक कचरा नष्ट करण्यासाठी अनेक उपकरणे पाहिले मात्र ग्रामपंचायतीचे उत्पन्न, यंत्राची किंमत आणि देखभालीचा खर्च याचे प्रमाण व्यस्त होते. महाजन यांना गावातील व्हर्जिन विंडस् या हॉटेलचे मालक दातार यांनी गॅसीफायर दाखविला. त्यामध्ये १२०० डिग्री सेल्सीअस तापमानाला प्लास्टिक जळून खाक होते. त्यातून निर्माण होणार्या ऊर्जेचा फायदा हॉटेलमधील पाणी तापविण्यासाठी होतो.
www.konkantoday.com