एमआयडीसीमधील अत्याधुनिक अग्निशामक केंद्राचा म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये अत्याधुनिक अग्निशामक केंद्र उभारण्यात आले असून या केंद्राचा जिल्ह्यातील सर्व भागाला उपयोग होईल तळ कोकणातील पहिलेच अत्याधुनिक अग्निशामक केंद्र रत्नागिरीत उभे राहिल्याचे म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी या केंद्राचा शुभारंभ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत मिरजोळे एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अग्निशामक केंद्राचा शुभारंभ म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या हस्ते झाला या वेळी पंचायत समिती सभापती विभाजली पाटील,जी प सदस्य बाबू म्हाप, मुख्य अग्निशामक अधिकारी संतोष वारिक, उपअभियंता पी टी करावडे, उद्योजक राजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना सामंत म्हणाले की या अग्नीशमक केंद्रासाठी आपण पाठपुरावा केला होता त्या वेळचे उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन रत्नागिरीत अत्याधुनिक अग्निशामक दल उभारण्याची मागणी आपण केली होती. त्याला निधी उपलब्ध करून देऊन मंजुरीही देण्यात आली होती त्यामुळे हे केंद्र आता उभे राहिले आहे
सध्या या अग्निशमन केंद्रात दोन अग्निशामक बंब व अठरा कर्मचारी कार्यरत आहेत.
www.konkantoday.com