विसर्जन केल्यानंतर समुद्र किनाऱ्यांवर आलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन,जिद्दी माउंटेनिअरिंगचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंग नेहमीच नव नवीन उपक्रम राबवत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिद्दी माउंटेनिअरिंगतर्फे विसर्जन केल्यानंतर समुद्र किनाऱ्यांवर आलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन व समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.ही मोहिम दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मांडवी समुद्र किनारी राबवण्यात येणार आहे.जिद्दी माऊंटेनिअरिंग च्या धीरज पाटकर यांनी सांगितले की हा एक कार्यक्रम आहे ज्याचे आम्ही नियमितपणे इच्छा नसतानाही आयोजन करतो. इच्छा नसते कारण आम्हाला असं वाटतं हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ येऊ नये. कार्यक्रमात बाप्पाच्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या आणि आपण जे निर्माल्य विसर्जित करतो ते ज्या भरतीमुळे किंवा इतर कारणांमुळे वाहत किनारी येतात त्याचे पुन्हा विसर्जन करतो. ज्या बाप्पाच्या भक्तीसाठी आपण वर्षभर वाट पाहतो आणि १.५, २.५, ५, ७ किंवा ११ दिवस मन लावून ज्याची पूजा करतो ती मूर्ती अश्या अवस्थेत बघून खूप वाईट वाटतं! म्हणून आमची इच्छा असते, माणसांची वृत्ती बदलावी, आणि मूर्तीचे हाल होऊ नयेत.पुढच्या वर्षी आम्ही सर्वांना शाडूच्या मातीच्या मुर्त्या स्थापन करण्याचे आवाहन करूयाच, चला तर मग तुम्ही सगळे उपस्थित राहाल, आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना घेऊन याल अशी अपेक्षा करतो.*
*आपुलकीची विनंती!*
*जिद्दी माऊंटेनिअरिंग*
खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
8390764464