राजीवडा येथे साडेअकरा लाखाची चोरी
राजीवडा येथील जामा मशिदीजवळ राहणाऱ्या साै.अफरोज जैनुद्दीन तांडेल यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून साडेअकरा लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.यातील फिर्यादी तांडेल ह्या राजीवडा जामा मशिदीजवळ डायमंड साऊंड सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे राहतात. तांडेल या सकाळी साडे अकरा वाजता कामासाठी बाहेर पडल्या घाईगडबडीत त्यांच्या पहिल्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा राहिला याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला त्यांनी घराचे पहिल्या मजल्यावरील असलेले बेडरूममधील नवीन कपाट उघडून कपाटाचा खण तीक्ष्ण हत्याराने फोडला.या खणात ठेवलेले साडे अकरा लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली याबाबत तांडेल यानी शहर स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com