
महसूल खात्याच्या कर्मचार्यांचा संप ,कामकाज ठप्प
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. महसूल खात्याचे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी नसल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. शासनाकडून तत्त्वत: मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हे महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. गेले महिनाभर या कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. लागोपाठ आलेल्या सुट्या ,गणपती सण व आता महसूल खात्याच्या कर्मचार्यांचा बेमुदत संप यामुळे सामान्य नागरिकांची सरकारी कामे अडून राहिल्याने व कोणतीही कामे होऊ शकत नसल्याने नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com