
दार उघडे ठेवून घरात झोपलेल्यांच्या घरातील दोन मोबाईल लांबविले
चिपळूण:चिपळून येथील नवीन भैरी मंदिरासमोर भैरी सानिध्य अपार्टमेंटमध्ये राहणारे वृषभ शंकर लागी यांच्या घरात शिरून चोरट्याने त्यांचे दोन मोबाईल लांबविण्याची घटना घडली आहे. यातील फिर्यादी वृषभ हे आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असता अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करून फिर्यादीच्या बाजूला ठेवलेला त्यांचा स्वतःचा व त्यांच्या मित्राचा मोबाईल सेट चोरून नेला. त्यानंतर जागे झालेल्या फिर्यादीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
www.konkantoday.com