दारू दिली नाही म्हणून परमिट रूमच्या मालकासह केली तिघांना मारहाण
परमिट रूम बंद केल्यानंतर दारू मागणाऱ्यांना दारू दिली नाही म्हणून हॉटेल मालकासह तिघांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. हा प्रकार चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे घडला शिरगाव येथील साई संकेत परमिट रूमचे मालक प्रवीण सावंत हे परमिट रूम बंद करून निघाले असता त्या ठिकाणी दीपेंद्र निचाेरे, देवेंद्र निचाेरे व राजेंद्र कासार हे तिघेजण चारचाकी वाहनातून तेथे आले त्यांनी परमिट रूमचे मालक सावंत यांच्याकडे दारूची मागणी केली परंतु आता परमिटरूम बंद केल्याने दारू मिळणार नाही असे सावंत यांनी सांगितले असता चिडलेल्या आरोपीनी सावंत यांचे सह हॉटेलमधील दोन जणांना मारहाण केली तसेच सावंत यांच्या डोक्यात हातातील पकड मारून दुखापत केली या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केले आहे.
www.konkantoday.com