
कंटेनर व मोटरसायकल अपघातात तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी:मुंबईहून गोव्याकडे मोटरसायकलने जाणार्या तरूणाची कंटेनरबरोबर टक्कर होवून झालेल्या अपघातात तेजस प्रकाश दंत (रा. घाटकोपर, मुंबई) याचा मृत्यू झाला. हा अपघात खेडनजिक खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. यातील तेजस दंत हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल एम.एच. ०४ एफएस ०५०५ ही मुंबई येथून गोव्याकडे जात असता त्याची खेडहून मुंबईकडे जाणार्या कंटेनर क्र. केए ०१/डी/५२७१ याच्याबरोबर समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात तेजस याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com