
*झी २४ तास वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश कदम यांचे निधन*
रत्नागिरी-* झी २४ तास या नावाजलेल्या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि रत्नागिरी शहरानजीकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम यांचे काल मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईतील सायन येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. ते ४५ वर्षांचे होते. निलेश कदम यांनी घरची शेती करून आठ किलोमीटरवरून येवून पत्रकारितेमध्ये कँमेरामन म्हणून ठसा उमटवला आहे. गेली १० वर्ष कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम हे गेली ५ वर्षे झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम करीत होते. आजपर्यत जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. दूरदर्शन, साम मराठी आणि झी २४ तास अशा चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे. दूरदर्शनपासून त्यांनी कॅमेरामन म्हणून कामाला सुरवात केली होती. त्यानंतर साम मराठी या चॅनलमध्ये काम केले. त्यानंतर आता झी २४ तास वृत्तवाहिनीत ते कॅमेरामन म्हणून काम करत होते. गेली १० वर्ष ते कॅमेरामनच्या भुमिकेत होते. चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्यात आलेल्या वादळांचे कव्हरेज त्यांनी केले आहे. निलेश कदम यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. www.konkantoday.com