
अभिजित गुरव यांची भाजप राजापुर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टी राजापुर तालुकाध्यक्षपदी अभिजित गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही नियुक्ती केली.अभिजित गुरव यांनी नुकताच आ. प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.अभिजीत गुरव हे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आहेत. नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com