
१८ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर ग्रामपंचायतींनी स्वच्छता ही सेवा मोहीम राबवावी रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (एसबीडी) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा (एसएचएस) मोहीम दि. १८ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. या अभियानात 18 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत दैनंदिन उपक्रम राबविण्याचे शासनाकडूनसूचित केले आहेत. 18 पासून स्वच्छता ही सेवा शुभारंभ, सप्टेंबर सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे गृह निर्माण -PMAY, घरगुती टॅब कनेक्शन – अमृत, JJM, कोणतीही राज्य योजना, वैयक्तिक शौचालय – SBM, वीज – पीएम सौभाग्य, बँकिंग – पंतप्रधान जनधन योजना, LPG उज्वला गॅस योजना, आरोग्य विभाग PM-JAY आयुष्यमान भारत, लसीकरण – मिशन इंद्रधनुष्य, क्रेडिट अॅक्सेस – बँक वित्त पुरवठा लिंकेज, विमा – PM सुरक्षा विमा योजना, PM जिवन गती विमा योजना या सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता तालुकास्तरावर विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. एक दिवस श्रमदानासाठी, सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक व बाजारपेठे, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, इत्यादी प्रत्येक तालुक्यात किमान 500 पुरुष व महिला सहभागी होणे आवश्यक आहे. खाऊ गल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबविणे. स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे. जिल्ह्यातील संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात (संगीत नृत्य प्रकार, संस्कृती दर्शन) करणे (कार्यक्रमाकरिता गर्दीच्या ठिकाणाची निवड करणे). एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करणे. गृहभेटीद्वारे जनजागृती करुन, एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर खासदार व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत रॅली आयोजित करण्यात येणार आहे. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शाळा व महाविद्यालयामध्ये स्पर्धा कचरा वर्गीकरण चर्चा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा घेणे. सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरूस्ती. 2024 Legacy Waste Sites साफसफाई करणे. वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा/शोष खड्डा निर्मिती करणे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उदघाटन करणे. स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभिकरण करणे. स्वच्छता प्रतिज्ञा, सेल्फी पॉईंट. स्वच्छता भारत दिन साजरा करणे. स्वच्छ माझे अंगण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.000