
२०० मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, लोकशाही दिनात तक्रार
रत्नागिरी:राजापूर तालुक्यातील आडिवरेनजिकच्या महाकाली न्यू इंग्लिश स्कूल नवेदरवाडी या महाविद्यालयातील २०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याची तक्रार माजी मुख्याध्यापक महादेव चव्हाण यांनी लोकशाही दिनात केली. या प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेतली असून या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या मुलांना तात्काळ शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com