
परांजपे ऍग्रोचे गणपती उत्सवासाठी खास मोदक
रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रसिद्ध काजू प्रक्रिया उद्योगातील परांजपे ऍग्रोने आता गणपती सणानिमित्त काजू व बदामाचे मोदक विक्रीसाठी आणले आहेत. रत्नागिरीतील एमआयडीसीमध्ये काजू प्रक्रियेचा उद्योग परांजपे ऍग्रोतर्फे सुरू असून या परांजपे ऍग्रोमधील काजू परदेशात निर्यात होत आहे. याशिवाय या ठिकाणी काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचाही उद्योग असून त्याला भारतात व परदेशात मागणी आहे. गणपती सणात विविध प्र्रकारच्या मोदकांना मागणी असते त्यासाठी काजूगर व बदाम बारीक करून त्यापासून मोदक तयार करण्याचा निर्णय परांजपे ऍग्रोचे ऋषिकेश परांजपे यांनी घेतला. प्रायोगित तत्वावर सुरू केलेल्या या मोदकाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परांजपे ऍग्रोचे हे वैशिष्ट्यपूर्ण मोदक रत्नागिरीतील आरोग्यमंदिर येथे रत्नविहार फूडस्, मारूती मंदिर येथील अभिनव वस्तू भांडार व हॉटेल सप्तगिरी माळनाका येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com