
रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदान येथे 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा.
रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदान येथे 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला रत्नागिरी सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारवास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी. ऋषीकेश दगडू तळेकर (24, ऱा उद्यमनगर रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आह़े. त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करत न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होत़े.रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी खटल्याचा निकाल दिल़ा सरकार पक्षाकडून ऍड़. मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े.
गुन्ह्यातील माहितीनुसार पिडीत मुलगी ही शहरातील खासगी डॉक्टरकडे कामाला जात होत़ी. आरोपी ऋषीकेश व पिडीत मुलगी एकमेकांच्या परिचयाचे होत़े. 30 जून 2020 रोजी सायंकाळी पिडीता ही कामातुन सुटल्यानंतर घरी एकटीच चालत जात होत़ी. यावेळी तिच्यावर नजर ठेवून असलेला संशयित आरोपी याने दुचाकीवरून तिला गोडबोले स्टॉप येथे गाठल़े.संशयित आरोपीत याने पिडीत मुलीला दुचाकीवर बस, मी तुला घरी सोडतो असे सांगितल़े. यावेळी पिडीतेने दुचाकीवर बसण्यास नकार दिला होत़ा. ऋषीकेश याने आग्रह केल्यानंतर पिडीता ही त्याच्या दुचाकीवर बसल़ी. ऋषीकेश आपल्याला घरी सोडेल असे या पिडीतेला वाटले होत़े. यावेळी ऋषीकेश याने दुचाकी चंपक मैदानाकडे घेवून गेल़ा. यावेळी चंपक मैदान येथील जंगलमय भागात तिच्यावर अत्याचार केल़ा.
घडलेला प्रकार घरी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी ऋषीकेश याने पिडीतेला दिल़ी.घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या पिडीतेने घरी येताच सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल़ा. याप्रकरणी ऋषीकेश याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 376 व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल़ा. गुह्याचा तपास शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन उपनिरिक्षक मुक्ता भोसले यांनी केल़ा. न्यायालयापुढे एकूण 20 साक्षिदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आल़े. कोर्ट पैरवी म्हणून शहर पोलीस ठाण्यातील हवालदार राहूल मोहिते यांनी काम पाहिल़े.