गणपती सणासाठी आलेल्या चाकरमान्यांमध्ये तापाचे ४५० रुग्ण आढळले
रत्नागिरी: गणपती सणासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत बसस्थानके, महामार्ग, रेल्वे स्टेशन व अन्य ठिकाणी आरोग्य पथके ठेवण्यात आली असून या पथकामार्फत येणार्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत १३ हजार चाकरमान्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४५० जणांवर औषधोपचार करण्यात आले. यामध्ये तापसरीच्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. ही आरोग्य पथके आता १२ सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
www.konkantoday.com