गणपतीपुळे ग्रामपंचायतीबाबत पाटील यांचे आरोप चुकीचे -सरपंच महेश ठावरे

रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत गणपतीपुळे येथील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्य गजानन पाटील यांनी केला होता मात्र त्यांनी कोणतीही माहिती न घेता केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.येथील कामांचे टेंडर करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. पाटील हे राजकीय खेळी करीत असून त्यातून काहीही साध्य होणार नाही. आपल्याच पक्षात राहून आपल्याच माणसाचे पाय ओढणे पाटील यांनी थांबवावे असेही ठावरे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button