
आंबोली घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग ः सततच्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटातील एक दरड रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. गेल्या काही दिवसात या घाटात अनेकवेळा दरडी कोसळून वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले होते. आता परत एकदा दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर, बेळगांव या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची ये-जा असते. याशिवाय मोठ्या प्रमाणात पर्यटकही या घाटात येत असतात. यामुळे सध्या सततच्या दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे वर्षा पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे.
www.konkantoday.com