संगमेश्वरी बोलीतील पहिली वेबसिरीज रसिकांच्या भेटीला
रत्नागिरी: रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून अक्रित झो मरनाच्या भायेर बेफाट ही वेबसिरीज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सिरीजच्या शीर्षक व शीर्षकगीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. येत्या २९ सप्टेंबरला वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.रात्रीस खेळ चाले या मालिकेचे कनालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगांव सरपंच वैशाली गावडे सनगरे यांच्या हस्ते या वेबसिरीज शीर्षकाचे अनावरण तर नाट्य परिषद रत्नागिरी शाखा कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शीर्षकगीताचे अनावरण केले. या वेबसिरीजची निर्मिती समर्थकृपा प्रॉडक्शन रत्नागिरी यांनी केली. कथा, पटकथा अनिल दांडेकर, क्रिएटीव्ह हेड सिद्धेश बंदरकर, सचिन काळे, संगीत गणेश घाणेकर, ध्वनी सरेंद्र गुडेकर, आराध्या साऊंड, प्रकाशयोजना संतोष सनगरे, अनिकेत गानू, मेकअप नरेश पांचाळ, चित्रिकरण साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, संकलन निखिल पाडावे, प्रॉडक्शन टीम मंगेश मोरे सांभाळत आहेत.
विशेष सहाय्य चवे, रानपाट, पोचरी ग्रामस्थांचे लाभले आहे. या वेबसिरीजमध्ये कलाकार सुनिल बेंडखळे, सचिन काळे, प्रभाकर डाऊल, अक्षता कांबळी, विश्वास सनगरे, मनाली मिराशी, रविंद्र गोनबरे, अनिकेत गोनबरे, हनुमान गोनबरे, आदेश मालप, योगेश बांडागळे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, केतन शिंदे, राज शिंदे हे आहेत.
शीर्षक गीत पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९