
लांजा तालुक्यातील माचाळ येथील रिव्हर्स फॉल परिसरात कार कोसळली ,सुदैवाने जीवितहानी नाही
जिल्ह्यात दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी पावसाबरोबर धुक्याचे साम्राज्य आहे लांजा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ येथील रिव्हर्स फॉल परिसरात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास . दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक इर्टिगा कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताच्या वेळी गाडीत तीन महिला आणि एक पुरुष असे एकूण चार जण होते. कार दरीत कोसळल्यानंतर तात्काळ त्यांनी स्थानिक माचाळ ग्रामस्थांशी संपर्क साधून मदतीची याचना केली. गाडीतील लोकांना बाहेर काढण्यात आले मात्र अंधारामुळे त्या रात्री गाडी बाहेर काढणे शक्य झाले नाही.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवार, २७ ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यासाठी क्रेन मशीनची मदत घेण्यात आली. अखेर, जेसीबी मशीनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात यश आले. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी उशिरापर्यंत अडकलेली गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
. या घटनेमुळे तालुक्यात माचाळ येथील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




