राजापूर येथील अर्जुना नदीच्या पुरात एक जण वाहून गेला
मुसळधार पावसाने राजापूर तालुक्यालाही झोडपले असून सतत पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे अर्जुना नदीची व कोदवली नदीची पाण्याची पातळी वाढली असून या नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. मुर गावातील राहणारे साळवी हे अर्जुना नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे.राजापूरमधील मुर भागालाही पावसाने झोडपले असून पाचल तळवडे मूर रस्त्यावर दरड आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
www.konkantoday.com