रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी:रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जाहीर होणारे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त आज जि.प. अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी जाहीर केले. यामध्ये मंडणगड येथील अमरदीप बळीराम यादव, दापोलीतील दिपिका दिपक मर्चंडे, खेड येथील अनंत सिताराम मोहिते, चिपळूण येथील दिपक नंदकुमार मोने, गुहागर येथील सुरेंद्र सदानंद चिवेलकर, संगमेश्वर येथील रसिका रविकांत शिंदे, रत्नागिरी येथील प्रकाश रघुनाथ पवार, लांजा येथील नरेंद्र गंगाराम पवार, राजापूर येथील संदीप बाळकृष्ण परटवलकर अशी पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील संतोश काशिनाथ चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा या पुरस्कारासाठी २४ शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून सर्वोत्कृष्ट काम करणार्या १० शिक्षकांची आदर्श पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिक्षण सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, उपशिक्षण अधिकारी सुधाकर मुरकुटे आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com