मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

कणकवली येथे आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणाचा कार व मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दापोली येथे घडली आहे.दापोली तालुक्यातील मालवण येथील राहणारे शैलेश मिस्री हे महावितरणमध्ये काम करत होते.त्या बरोबर मूळचे कणकवली येथील राहणारे विजय परब हे देखील काम करीत असल्याने त्यांची मैत्री होती.परब हे आपल्या गावी कणकवली येथे गेले होते तेथे त्यांनी आत्महत्या केली.ही घटना कळाल्यावर शैलेश मिस्त्री हे मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकल घेऊन कणकवली येथे गेले होते.अंत्यसंस्कार करून परत दापोली येथे येत असताना दापोली रोडवर समोरून येणार्‍या कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली यामुळे या अपघातात शैलेश मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button