मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली
केरळमध्ये पडणार्या मुसळधार पावसाचा परिणाम कोकण रेल्वे वाहतुकीवर झाला होता.त्यामुळे बऱ्याच गाड्या उशिराने धावत होत्या.त्यात कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी स्थानकानजीक मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूतील वाहतूक बंद झाली होती.याचा थेट परिणाम रत्नागिरी दादर पॅसेंजर वर झाला.दादर रत्नागिरी पॅसेंजर मंगळवारी रात्री १०.२० वाजल्यापासून तीन तास करंजाडी स्थानकात उभी होती.यामुळे ती उशिराने खेड स्थानकात पोहचली.ठप्प झालेली वाहतूक तीन तासाने पूर्वरत करण्यात आली.वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर दादर रत्नागिरी गाडीला मार्गस्थ करण्यात आले मात्र यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी थिविम एक्स्प्रेस अजनी स्थानकावर,तुतारी एक्सप्रेस खेड स्थानकांवर,कोकण कन्या दिवाणखवटी स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकांची मात्र चांगलीच गैरसोय झाली.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९