
चिपळूण खेर्डी माळेवाडी येथे पुन्हा घरफोडी
चिपळूण शहरानजीक असलेल्या खेर्डी माळेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने व रोख रक्कम लांबवल्याची घटना घडली असतानाच आता परत एकदा या परिसरात घरफोडी झाली आहे. खेर्डी माळेवाडी येथील अाैदुंबर वसाहतीत राहणारे संतोष मोरे यांच्या फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडला व घरातील कपाटातील लॉकर उघडून त्यामधील दागिने वा अन्य असा ७९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चोरीचा प्रकार उघड झाल्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
www.konkantoday.com