क्रेडिट कार्डमधून पावणेचार लाख रुपये चोरले
जिल्ह्यात एटीएम कार्डचे डिटेल्स विचारून खात्यावरील रक्कम काढून घेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.यामुळे ऑनलाइन वापर करून बँक व्यवहार करणार्या काही जणांना त्याचा फटका बसत आहे.पुणे धायरी वडगाव येथील राहणारे गणेश शंकर खांबे हे चिपळूण तालुक्यातील टेरव येथे आले असता त्यांची फसवणूक झाली त्यांनी चिपळूण स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यामधून ३लाख ८६हजार एवढी रक्कम अज्ञात इसमाने फसवणूक करून काढून घेतली याबाबत त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com