श्रेयाच्या वादात चिपळूण येथील शिवपुतळ्याचे दोन वेळा भूमिपूजन?
चिपळूण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून याचे श्रेय नेमके कुणी घ्यायचे यात चढाओढ लागली आहे. शिवसेनेने देखील हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. तर भाजपाच्या नगराध्यक्ष असलेल्या सुरेखा खेराडे देखील याचे श्रेय भाजपला मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा नियोजनमधून या पुतळ्यासाठी निधी दिला असल्याने ४ सप्टेंबरला त्यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.तर काही दिवसांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते देखील या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com
________________________
जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९