शिवसेनेच्या फरजाना डांगे सरपंचपदी विजयी

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या उमेदवार फरजाना डांगे यांनी मंदार घाटगे यांचा पराभव केला. त्यामुळे जयगड ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. जयगड साखरपा मोहल्ला ग्रामपंचायतीसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. सरपंच पदासाठी शिवसेना पुरस्कृत फरजाना डांगे यांना १०७७ मते मिळाली. जयगड ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विशाल झगडे, प्रमिला झगडे, दर्शना चव्हाण, अमेय पालकर, देवयानी मयेकर हे विजयी झाले तर मुनाफ संसारे, फैमिना संसारे, साजिद जांभारकर, देवयानी खाडे याआधीच बिनविरोध निवडून आले होते. निवडून आलेल्या फरजाना डांगे यांचे तालुकाप्रमुख अजित साळवी यांनी अभिनंदन केले.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button