
मांडवी येथील गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे काम सुरू, जागेबाबत ग्रामस्थांच्या सूचना
रत्नागिरी: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोकणातील गणेश विसर्जनाच्यावेळी गणेश विसर्जन नद्या, खाड्या व समुद्रात न करता कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन केले होते. इकोफ्रेंडली उत्सव साजरा करताना विसर्जनाच्यावेळी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित केल्याने कोणतेही प्रदूषण होणार नाही. असे झाल्यास एक चांगला संदेश सर्वांसमोर रत्नागिरीकरांकडून जाईल. यासाठी त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेला मांडवी किनार्याच्या बाजूला कृत्रिम तलाव करावा अशा सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे नगर परिषदेने या कृत्रिम तलावाचे काम सुरू केले आहे. परंतु निवडलेली जागा ही चुकीची असून या जागेच्या बाजूने जात असलेल्या गटारामुळे त्याचे पाणी या तलावाच्या खड्ड्यात झिरपत असल्याचे काही ग्र्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. संबंधित यंत्रणेने आताच योग्य ती उपाययोजना करून त्यात सुधारण करणे जरूरीचे आहे.
नवीन उपक्रम राबविताना मूर्तीचे पावित्र्य व लोकांच्या भावनादेखील जपणे आवश्यक आहे. तरच अशा नव्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळू शकणार आहे. असे उपक्रम राबविताना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृतीही करणे जरूरीचे आहे.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९