
नादुरुस्त मोडका घर पुलाला पर्याय नाही
गुहागर येथील मोडका घर पूल नादुरुस्त झाल्याने त्याला पर्यायी रस्ता देऊ असे आश्वासन अनेक राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने दिले होते. आता प्रत्यक्षात हे आश्वासन कोणीच पूर्ण करीत नसल्याचे दिसत आहे. हा पूल बंद पडल्याने वाहनांना गुहागर रानवी मार्गे असा जादा वळसा घालावा लागत आहे. हा पूल दुरुस्त होईपर्यंत पर्यायी मार्ग काढले जातील असे आश्वासन राजकीय नेत्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्ष तेची कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचे कळते. प्रशासनाने या पुलावरून वाहतूक बंद केल्याने नागरिकांना मात्र अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
www.konkantoday.com
_______________________
जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९