ऐन गणपती उत्सवात पावसाचा जोर
कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा व उत्साहाचा असलेला गणपती सणासाठी चाकरमानी मोठय़ा प्रमाणात कोकणात दाखल झाले आहेत. मात्र गेले तीन चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर केला आहे.काल गणेश आगमनाच्या दिवशी देखील पावसाने जोर केल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.अनेकांना आपल्या गणेशाचे आगमन गाडीतून किंवा मुर्त्या प्लॅस्टिकचे कापड घालून आणाव्या लागल्या.याशिवाय पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले. मुंबई गोवा हायवेवर येणाऱ्या चाकरमान्यांना पाऊस व खड्डय़ांच्या समस्येला तोंड द्यावे लागत प्रवास करावा लागला.गेले आठ पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन गणपती उत्सवात जोर केला आहे.
www.konkantoday.com