साडवली जलस्वराज्य योजनेत गैरव्यवहार ,६जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील साडवली ग्रामपंचायतींमध्ये जल स्वराज योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण भरमळ यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वच्छता समिती अध्यक्ष नितीन पाटोळे, सचिव सीमा जाधव ,विकास समिती अध्यक्ष प्राची भोपाळ कर , सचिव समिता माने, तत्कालीन सरपंच साक्षी नाखरेकर, तांत्रिक सेवा पुरवठादार मनोज जोशी या सहा जणांविरुद्ध देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साडवली ग्रामपंचायतींमध्ये जल स्वराज्य योजनेमध्ये गैर व्यवहार झाल्याची तक्रार लोकशाही दिनात दाखल झाली होती त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्यामध्ये योजनेतील महत्त्वाची असलेली मोजमाप दस्तऐवज नष्ट केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे हीयोजना अंदाजे एक कोटी रुपयांची असल्याचे कळते.
www.konkantoday.com