
मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
रत्नागिरी: २ सप्टेंबरला गणेशचतुर्थीची सार्वजनिक सुट्टी असल्याने दि. ३ सप्टेंबरला दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. सोमवारच्या सार्वजनिक सुट्टीमुळे दि. ३ सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घेवून दुपारी १ ते २ या वेळेत आपली निवेदने सादर करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com