बेकायदेशीर मिनी पर्ससीन मासेमारी रोखण्यास मत्स्यखात्याची यंत्रणा अपुरी
रत्नागिरी:उद्यापासून पर्ससीन मच्छिमारांच्या हंगामाला सुरूवात होणार आहे. मत्स्य खात्याने सागरी हद्दीची दिलेली मर्यादा राखून ही मच्छिमारी होणार आहे. मत्स्य खात्याच्या नियमाप्रमाणे १२ नॉटीकल्स मैलाच्या पुढे समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी मच्छिमारांना देण्यात आली असून जिल्ह्यात अवघ्या काही मच्छिमारांकडेच मच्छिमारीसाठी परवानगी आहे. अन्य शेकडो मिनी पर्ससीन नौकांना परवानगी नाही. त्यामुळे या नौका १२ नॉटीकल मैलाच्या पुढे न जाता किनार्यालगत येवून कमी पाण्यात मच्छिमारी करतात. याचा फटका पारंपारिक मच्छिमारांना बसतो. त्यामुळे आता अशा बेकायदेशीर मच्छिमारी करणार्या नौकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी मत्स्य खात्याची यंत्रणा अपुरी असल्याने यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे.
www.konkantoday.com