रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्यावतीने सुदेश मयेकर यांची उमेदवारी निश्चित?
रत्नागिरी:रत्नागिरी नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर हे रत्नागिरी मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविण्यास उत्सुक असून त्यांना राष्ट्रवादीकडून निश्चित उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. मयेकर हे तरूण, तडफदार नगरसेवक असून त्यांना विविध कामांचा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी रत्नागिरी तालुक्यात अनेक भागात क्रीडास्पर्धा व अन्य सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे लढत देवू शकेल असा राजकीय होरा असल्याने मयेकर यांचे नाव निश्चित होत आहे. मयेकर यांच्या उमेदवारीला अन्य पक्षाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com