यावर्षी ढोलकीचे दरही कडाडले

रत्नागिरी:दरवर्षी गणपती उत्सवासाठी डोलकी घेवून येणारे कारागिर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दरवर्षी उत्तर प्रदेशमधून हे कारागिर कोकणात येतात. कोकणात घराघरात गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. अनेकवळेला आरत्या ढोलकीच्या तालावर सादर केल्या जातात. त्यामुळे या कारागिरांनी बनविलेल्या ढोलकीला गणपती उत्सवात मोठी मागणी असते. या १५-२० दिवसांच्या काळात या व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे कारागिर कोकणात दाखल झाले असून रत्नागिरीत देखील या कारागिरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. मात्र यंदा इतर वस्तूंप्रमाणे ढोलकीच्या किंमतीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. लहान मुलांसाठी असलेल्या ढोलक्यांची किंमत ३०० रुपयांपासून मोठ्या ढोलकींची किंमत ६५० रु. आहे तर काही ढोलक्यांची किंमत २५०० रुपयांपर्यंत आहे. कोकणातील माणूस हा उत्सवप्रिय असल्याने महागाई असली तरी तो उत्सव मात्र थाटातच साजरा करीत असल्याने या ढोलकी कारागिरांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button