माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेटये यांचे दोन्ही सुपुत्र शिवसेनेत दाखल
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व कार्यसम्राट कै.उमेश शेटये यांचे चिरंजीव केतन शेट्ये व वक्रतुंड शेट्ये यांनी आज म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, प्रमोद शेरे,बिपीन बंदरकर, संजू साळवी आदि जण उपस्थित होते चार दिवसांपूर्वीच आमदार उदय सामंत यांच्या समावेत केतन शेट्टये वक्रतुंड शेट्टये यांनी मुंबई येथे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित होते. शेटये बंधूंच्या प्रवेशामुळे आगामी होणार्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
www.konkantoday.com