
मनोरूग्णांना लागणार्या औषधांसाठी नातेवाईकांना करावी लागतेय फरपट
रत्नागिरी:रत्नागिरी येथे असलेल्या मनोरूग्णालयात रत्नागिरीबरोबरच आजुबाजूच्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कराड, रायगड येथील रूग्ण दाखल केले जातात. या रूग्णांवर येथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येते. यासाठी त्यांना लागणार्या औषधांची असलेली गरज मनोरूग्णालयाकडून पुरवली जाते. रत्नागिरी मनोरूग्णालयात असे बरे झालेले रूग्ण मोठया संख्येने असुन त्यांना मनोरूग्णालयाकडून औषधे दिली जातात. ही औषधे त्यांना दरमहिना घेणे जरूरीचे असते अन्यथा त्याचा विपरित परिणाम होवू शकतो. ही औषधे येथील मनोरूग्णालयातून रूग्णाच्या नातेवाईकांना स्वतः येवून घेवून जावी लागतात. विशेष म्हणजे महिन्याच्या औषधाची किंमत केवळ १० रु. अशी किरकोळ असते परंतु हे औषध घेण्यासाठी प्रत्यक्षात आले पाहिजे असा नियम असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना जाण्यायेण्याचा भुर्दंड पडत आहे. तसेच त्यांच्या वेळेचाही अपव्यय होत आहे. ज्या भागातील रूग्ण आहेत त्या भागातील शासकीय रूग्णालयात बरे झालेल्या रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून दिल्यास या नातेवाईकांची फरपट संपू शकते.
www.konkantoday.com