
पार्किंग केलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने पळवली
रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील टीआरपी येथून बाफना कंपनीकडे जाणार्या रस्त्यावर फिर्यादी मनोज भगवान खामकर (रा. नाचणे) यांची रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती पळवून नेली आहे. यातील फिर्यादी मनोज खामकर हे बाफना कंपनीकडे जाणार्या रस्त्यावर रिक्षा पार्क करून रिक्षा लॉक करून रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते.भाजी खरेदी करून आल्यानंतर त्यांची रिक्षा जागेवर आढळून आली नाही. सदर रिक्षेचा नंबर एम.एच. ०८/एक्यू/३३८२ असून तिची किंमत अंदाजे दीड लाख रुपये आहे.
www.konkantoday.com