पादचार्याला रिक्षाची धडक, पादचारी जखमी
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील चर्मालय ते क्रांतीनगर रस्त्यावरून चालत जाणार्या पादचार्याला रिक्षाने धडक दिल्याने तो जखमी झाला आहे. यातील फिर्यादी शिवाजी हणबर (रा. कोकणनगर) हा चर्मालय ते क्रांतीनगर या रोडवरून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जात असताना पाठिमागून आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यामुळे फिर्यादी हे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीत जावून पडले. त्यांच्याबरोबर असलेल्या माणसाला धडक बसल्याने तोही जखमी झाला. सदरचा रिक्षाचालक न थांबता निघून गेल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com